इंदौरमधील इंडियन टेलिव्हिजन अॅकेडमी अॅवॉर्ड्समध्‍ये ‘भाबीजी घर पर है’ आणि ‘हप्‍पू की उलटन पलटन’ची चमकदार कामगिरी

पुन्‍हा एकदा &TV ला भव्‍य यश मिळाले आहे. चॅनेल आपल्‍या दोन लोकप्रिय मालिका ‘भाबीजी घर पर है’ आणि ‘हप्‍पू की उलटन पलटन’साठी प्रेक्षकांकडून मिळत असलेल्‍या प्रचंड प्रेमाला साजरे करत आहे. या दोन लोकप्रिय मालिकांच्‍या कलाकारांनी नुकतेच सिद्ध केले की, ते सर्वात प्रतिभावान कलाकार आहेत आणि प्रेक्षकांमध्‍ये खूपच लोकप्रिय देखील आहेत. हलकेफुलके विनोद व जुडले जाता येईल अशा कन्‍टेन्‍टसह देशवासीयांची मने जिंकणा-या या मालिकांना इंदौरमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या १९व्‍या इंडियन टेलिव्हिजन अॅकेडमी (आयटीए) अॅवॉर्ड्समध्‍ये ४ पुरस्‍कार मिळाले.
‘भाबीजी घर पर है’ मालिकेने टेलिव्हिजन क्षेत्रामध्‍ये आपला दबदबा निर्माण केला आहे. प्रत्‍येक एपिसोडसह प्रेक्षकांना अचंबित करणा-या या मालिकेला पुरस्‍कार सोहळ्यामध्‍ये कॉमेडी विभागांतर्गत बेस्‍ट टेलिव्हिजन शो पुरस्‍कार मिळाला. या उत्‍साहपूर्ण क्षणाबाबत आपला आनंद व भावना व्‍यक्‍त करत निर्माते संजय कोहली व बेनेफर कोहली म्‍हणाले, ”भाबीजी घर पर है ही टेलिव्हिजनवरील अशी मालिका आहे, जी प्रेक्षकांना कधीच उदासवाणे क्षण देत नाही. नेहमीच नवीन व अनोखे एपिसोड्स असतात आणि हे एपिसोड्स प्रेक्षकांच्‍या मनोरंजन आवडीप्रमाणेच असतात. मला आनंद झाला आहे की, आमच्‍या मालिकेला या सन्‍मानासह गौरविण्‍यात आले आहे.”
परिपूर्ण विनोदी कन्‍टेन्‍ट व टाइमिंग या पुरस्‍कारासह गौरविण्‍यात येण्‍यासोबतच कलाकारांना देखील त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय अभिनयासाठी पुरस्‍कारासह गौरविण्‍यात आले. आपली लाडकी चुलबुली अंगूरी भाभीला मालिकेमधील तिच्‍या अंगूरी भूमिकेसाठी सर्वोत्‍तम अभिनेत्रीचा पुरस्‍कार देण्‍यात आला. आनंदित झालेली शुभांगी म्‍हणाली, ”आपले प्रयत्‍न व प्रतिभेला गौरविण्‍यात येणे हा नेहमीच एक सन्‍मान आहे. हा पुरस्‍कार माझ्या यशाचे प्रतीक आहे आणि माझ्यासाठी अधिक मेहनत घेत स्‍वत:ची सर्वोत्‍तम बाजू सादर करण्‍याकरिता एक प्रेरणा देखील आहे. माझे स्‍वत:चे मूळ गाव इंदौरमध्‍ये भारतीय टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्‍हणून पुरस्‍कार मिळण्‍यासारखी दुसरी आनंदाची बाब नाही.”
शुभांगी अत्रेवर तिच्‍या भूमिकेसाठी प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याबाबतीत ढेरपोट्या दरोगा हप्‍पू सिंग देखील मागे नाही. &TV वरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये दरोगा हप्‍पू सिंगच्‍या भूमिकेसह टेलिव्हिजन क्षेत्रावर प्रभुत्‍व गाजवणारा आणि त्‍यासोबतच मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील आपल्‍या विनोदी कृत्‍यांसह प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करणारा अभिनेता योगेश त्रिपाठीला ‘भाबीजी घर पर है’साठी बेस्‍ट अॅक्‍टर इन ए सपोर्टिंग रोल पुरस्‍कार मिळाला. वर्षानुवर्षे चित्रपटांमध्‍ये, तसेच टेलिव्हिजनवर अधिपत्‍य गाजवणारी हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍माला तिच्‍या टेलिव्हिजनवरील दिग्‍गज योगदानासाठी पुरस्‍कार मिळाला.
मालिकेसाठी पहिला आयटीए पुरस्‍कार मिळाल्‍याबाबत बोलताना योगेश त्रिपाठी म्‍हणाला, ”माझ्यासाठी खरेतर हा अत्‍यंत स्‍वप्‍नवत व उत्‍साहपूर्ण क्षण आहे. मी दीर्घकाळापासून ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये हप्‍पू सिंगची भूमिका साकारत आहे. मला हा पुरस्‍कार मिळाल्‍याने खूप आनंद झाला आहे. मी कधीच कल्‍पना केली नव्‍हती की, हप्‍पूसारखी डायनॅमिक व आगळीवेगळी भूमिका माझ्या जीवनाला कलाटणी देईल. मला पाठिंबा देणा-या व हप्‍पूवर प्रेमाचा वर्षाव करणा-या प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे मी आभार मानतो. मी पूर्वीप्रमाणेच पुढे देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहण्‍याची आशा करतो.”
मिळालेल्‍या मोठ्या यशाबाबत बोलताना हिमानी म्‍हणाल्या, ”मला हा सन्‍मान मिळाल्‍याने खूप आनंद झाला आहे. मी काही वर्षांपासून चित्रपट व टेलिव्हिजन क्षेत्रामध्‍ये काम करत आहे आणि यासाठी गौरविण्‍यात येण्‍यासारखी दुसरी आनंददायी बाब नाही. आम्‍ही कलाकार प्रेक्षकांच्‍या प्रेमासाठी आसुसलेले असतो आणि पुरस्‍कार व गौरवाच्‍या रूपात हे प्रेम मिळाल्‍याने असे वाटते की, जीवनातील स्‍वप्‍ने पूर्ण झाली आहेत. मी अभिनेत्री बनण्‍याचा निर्णय घेतलेल्‍या क्षणाचा आभार मानते. मला आनंद होत आहे की, मी माझ्या सुरूवातीच्‍या दिवसांमध्‍ये समोर आलेल्‍या अडथळ्यांमधून मार्ग काढू शकले. हे अडथळे मला मोठे स्‍वप्‍न पाहण्‍यापासून आणि ते साकारण्‍यापासून थांबवू शकले नाहीत. माझ्या यशाचे श्रेय मी अनेक लोकांना देते. यामध्‍ये मी या वर्षांदरम्‍यान ज्‍यांच्‍यासोबत काम केले ते सर्वोत्‍तम दिग्‍दर्शक, माझे अनेक सहकलाकार, माझे आईवडिल यांचा समावेश आहे. त्‍यांच्‍या पाठिंब्‍याशिवाय मी आज या यशावर पोहोचले नसते. मी माझ्या मुलाचे देखील आभार मानते. त्‍याने सतत मला पाठिंबा दिला आणि मी आज ज्‍या टप्‍प्‍यावर पोहोचली आहे त्‍यासाठी प्रोत्‍साहित केले. तसेच माझ्यावर कामावर विश्‍वास ठेवलेले आणि यापुढे देखील विश्‍वास ठेवणा-या माझ्या प्रेक्षकांचे देखील आभार मानते.”
सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!

error: Content is protected !!